Ad will apear here
Next
वर्तुळ.
वर्तुळ. 🎯🎯🎯🎯वर्तुळ लिहीतांना सुद्धा शब्द गोलाकारच जास्त येतात. आकारच तसा आहे याचा.गोल, गरगरीत, वाटोळा, चक्राकार, गोलाकार, गोलाई, गोलार्ध अशी अनेक विशेषणे जरी या शब्दाला असली तरी अर्थ मात्र एकच निघतो. एका बिंदूपासून सुरु होऊन दुसरया बिंदुला येऊन मिळाले की ," वर्तुळ " पुर्ण होते आणि परत त्याच बिंदूपासून दुसरया वर्तुळाला सुरुवात होते, म्हणजे मला असे म्हणायचे आहे की एखाद्या बैठ्या खेळाची सुरुवात जशी आपण एका बिंदूपासून अथवा व्यक्तीपासुन सुरु करतो आणि गोल गोल फिरत आपण त्या व्यक्तीला हरवण्यासाठी प्रयत्न करत राहतो स्वतः जिंकण्यासाठी. मानवी जीवनाचे रुपसुद्धा असेच आहे नाही का? माणसाच्या जन्मापासुन ते मृत्युपर्यंत आपण असेच गोल गोल धावत असतो, एका बिंदूपासून ते दुसरया बिंदूपर्यंत. एकामागून एक वर्तुळ पार करत असतो. जन्म घेतला की बाल्यावस्था पार करेस्तोवर एक वर्तुळ, तरुणपण ते प्रौढावस्थेपर्यंत दुसरे वर्तुळ आणि प्रौढावस्था संपली की तिसरे वर्तुळ वृद्धावस्था संपेपर्यंत. किती नकळतपणे आपण गोलगोल फिरत असतो. मला अस वाटतं की या सर्वांचा विचार केला तर सगळयात छोटे वर्तुळ बाल्यावस्थेचे असावे, कारण त्या अवस्थेमध्ये आहे त्या परिस्थितीत आनंदी रहाणे एवढेच माहीती असते. पण जसे जसे आपण मोठे होतो तशीतशी प्रौढावस्थेपर्यंत एखाद्या स्पर्धेत असल्यासारखे धावत असतो, आजकाल तर अस झाले आहे की सर्वांनाच आधुनिक रहाणीमानासोबत श्रीमंती थाटपण हवा असतो, मोठ्या शहरात अत्याधुनिक सुखसविधांनी अद्यावत असलेला फ्लॅट, आलीशान नाही तरी सुसज्ज अशी गाडी आणि हे सर्व प्राप्त करण्याकरता मग गलेलठ्ठ पगाराची नौकरी हवीच. मग शिक्षणपण तसेच पाहिजे असत महागडं.तारुण्याच्या उंबरठ्यावरच प्रौढावस्थेचे वर्तुळ सुरु होत,एका जीवघेण्या शर्यतीत असल्यासारखे वाटते, जोपर्यंत आपले ईप्सित सिद्धीस जात नाही तोपर्यंत धाव धाव धावायचे.पण एवढे सगळे मिळवुनही समाधान असतं का? नाही, कारण स्पर्धेचे तिसरे वर्तुळ लगेच तयार असत गोल गोल फिरण्याकरता.वलय निर्माण करणे किंवा त्याकरता स्वप्न पाहणे गैर नाही, पण स्वप्नपूर्ती होण्याकरता आपली आर्थिक आणि शारीरिक क्षमतेचाही विचार करणे आवश्यक आहे. स्पर्धेत धावण्याकरता लंगडा घोडा कुचकामी असतो हे लक्षात घेतले पाहिजे. पण आजकाल हे लक्षातच घेत नाही कोणी, ऊर फुटेस्तोवर धावायचे आहे, जिंकायचे आहे एवढेच फक्त माहीती आहे,हरायला कोणी तयारच नाही, वास्तवात पाहिले तर कधी कधी हरणारा सुद्धा त्याच्या जवळ काही नसतांना जिंकुन जातो, त्याला सुखाची व्याख्या समजले ली असते.जिंकित व्यक्तीपेक्षा तो हारण्यातही समाधानी असतो,आणि जिंकलेला व्यक्ती एक वर्तुळ पार केल्यानंतर परत दुसरया स्पर्धेच्या वर्तुळात धावण्याकरता तयार होतो.ईच्छा, आकांक्षांचा वारू चौफेर धावत असतो, पण या धावण्यात आपण किती किंमती क्षण मागे सोडले आहेत याचे त्याला काहीच भान नसते.जीवनरुपी गोलाकार खेळात फक्त धावणे आणि जिंकणे एवढेच त्याला ठावुक असते. तो गोलाकार धावतच असतो आणि कायम असमाधानी राहुन किंवा एक दुसरयाशी स्पर्धा करुन कायम दुःखी असतो कारण वलयाच्या बाहेर जाणेच अमान्य असते.🎯🎯तारुण्यावस्थेचे वर्तुळ यशस्वीपणे पार केले की प्रौढावस्थेचे वर्तुळ सुरू होते, ईथही परत तीच गत.पैसा, प्रसिद्धी, फाॅरेन ट्रीप, समाजात वलयांकित स्टेटस असुनही आता आस असते ती आतापर्यंत धावुन धावुन पुर्ण केलेल्या स्वप्नांचे मुल्यमापन करण्याची, पण तोपर्यंत संधी निघुन गेलेली असते, प्रौढावस्थेच्या वर्तुळात प्रवेश केला की डोळयावरची झापड कमी व्हायला सुरुवात होते.हळुहळु महत्व कमी होते आणि नशा उतरायला लागते, हातातल्या गोष्टी निसटायला लागतात.उतारवयाची चाहुल लागलेली असते.🎯🎯प्रौढावस्थेत लागलेली काळजी, चिंता आणि उर्वरीत आयुष्याचे गणित सोबत घेऊन वृद्धावस्थेच्या वर्तुळात कधी प्रवेश होतो ते आपल आपल्याच समजत नाही, मोह, काल्पनिक दुनियेच्या आहारी गेलेले शरीर किंवा मन त्यातुन बाहेर पडायलाच पहात नाही, परत धावणे सुरु होते. मग आठवतात मान ,अपमान, नीतिमत्ता, जीवनमुल्ये, परोपकार, संस्कार या गोष्टी आणि त्यांचे महत्त्व. वृद्धावस्था म्हणजे लेखाजोखा असतो तुमच्या आयुष्याचा, ज्या चुका आपण केलेल्या असतील त्याची पुनरावृत्ती होऊन म्हातारपणी त्याची फळ चाखावी लागु नयेत म्हणुन ते टाळण्यासाठी परत धावणे सुरु होते ते जीवनाच्या अंतीम श्वासापर्यंत. आणि ईतके धावुनही शेवटी रीकाम्या हातांनीच या जगाचा निरोप घ्यावा लागतो.वृद्धावस्थेचे शेवटचे वर्तुळ पुर्ण होत नाही तोच एक नवीन जीवनाचे वर्तुळ तयार होण्यास सुरवात झालेली असते,परत तोच प्रवास सुरू होतो,बिंदूपासून बिंदुकडे वर्तुळ पुर्ण करण्याकडे.🎯🎯सौ. माधवी जोशी माहुलकर.🌷🌷( माझी पोस्ट माझ्या नावासकट शेयर करण्यास माझी काहीच हरकत नाही. ) 🙏🏻🙏🏻 #marathi #marathimovies #marathiatricle #marathisongs #oldhindisong #marathibooks #marathibook #marathiwriter #writers #write #writer
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DWBPCS
Similar Posts
अगतिक मातृत्व. *अगतिक मातृत्व*. दुपारचा दिड वाजत आला होता,आज सुमनला सकाळची धुण भांड्यांची काम आटोपुन घरी जायला जरा वेळच झाला होता. चार वाजता तीला परत सिन्हा बाईंकडे कीटी पार्टी असल्यामुळे कामावर जायचे होते, तीला सध्या काळजी लागली होती ती घरी एकटा असलेल्या आपल्या पोराची, दिपकची.
विसाव्याचे क्षण "थकलो बुवा आज, आज ऑफीसमध्ये काम करायचा कंटाळा येत होता, खुप झोप येत होती, आताशा नको वाटत हे सगळं,"आजकाल पन्नाशीत आलेल्या लोकांचे हे वाक्य आपल्याला घरोघरी ऐकायला मिळतात, खरच ही बाब विचार करायला लावणारी आहे. अडीच अक्षराचा जन्म आणि अडीच अक्षराचा मृत्यु ह्या दोन शब्दांच्या गर्तेतच मनुष्य फिरत असतो.
गजरा "सौमित्र, अरे रात्रीचे अकरा वाजलेत, तुझी आई परत घरात दिसत नाही आहे रे.." नानांच्या त्या हाकेने सौमित्र एकदम आपल्या खोलीतुन बाहेर आला,तसे नानांनी त्याला जवळ घेऊन आई घरात कुठेच दिसत नसल्याचे सांगितले.
मनाचिये गुंती. " मनाचिये गुंती गुंफियेला शेला, बाप रखमादेवीवरु विठ्ठले अर्पिला,मोगरा फुलला, मोगरा फुलला." मला ज्ञानेश्वरांनी रचलेल्या या ओळी नेहमीच भुरळ पाडतात.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language